युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल उमरखेड येथे ‘ संस्कृती संगम ‘कार्यक्रम उत्साहात
युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल उमरखेड येथे ‘ संस्कृती संगम ‘कार्यक्रम उत्साहात
उमरखेड : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संस्कृती संगम स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन व दिप प्रज्वलन तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, गटशिक्षणाधिकारी विजय बेतेवाड हे होते. संस्थेचे अध्यक्ष ऍड. संतोषजी जैन,उपाध्यक्ष कमलजी माहेश्वरी,सचिव संतोषजी माहेश्वरी, संस्थेचे सदस्य भगवानजी अग्रवाल, सतेजजी जैन, गोरक्षण संस्थेचे सदस्य मनोजजी माहेश्वरी यांचे सह शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा फुलेवार, मुख्याध्यापिका विजया ठाकरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
तहसीलदार राजेश सुरडकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर न करणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला तर गटशिक्षणाधिकारी विजय बेटेवाड यांनी विद्यार्थ्यांना अशा कलागुणातून कौशल्य प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते म्हणून अशा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची सूचना केली. संस्थेचे अध्यक्ष ऍड. संतोषजी जैन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सर्वतोपरी प्रयत्न करेल व विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देण्याचा मानस व्यक्त केला.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नर्सरीतील चिमुकल्यापासून ते दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत
सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये देशभक्ती गीत, सामाजिक प्रबोधन, स्वच्छ भारत अभियान, शिक्षण आणि अंधश्रद्धा अशा विविध विषयावर नृत्य आणि नाटिका सादर करण्यात आल्या व इतर राज्याचे लोककला व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. सदर स्नेहसंमेलनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. दोन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



