आ.पा .ने फोडली नागरिकाच्या समस्येला वाचा.

youtube

आम आदमी पा ने फोडली नागरिकांच्या समस्येला वाचा

हदगाव (प्रतिनिधी) –

हदगाव शहरातील वॉर्ड न 17 , भारत नगर नवी आबादी तामसा रोड हदगाव च्या नागरिकांना पायी चालण्यास बरोबर रस्ता नाही , त्यामुळे लहान बालके , जेष्ठ नागरिक , वयोवृद्ध नागरिक , अपंग नागरिक याचे पायी चालून बाजारात जावे किंवा इतर कामासाठी घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे , त्यात पिण्याच्या व इतर कामासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे नागरिकांना इकडे – तिकडे भटकंती करून कसेबसे पाणी आणावे लागत आहे आणि इतर अंघोळीची , कपडे धुतलेले पाणी दोन्ही बाजूस नाल्या नसल्यामुळे सरळ रस्त्यावर येत आहे त्यामुळे अगोदरच येथील जमीन काळीची चिखल होणारी असल्यामुळे रस्ता बाराही महिने चिखलमय राहात आहे .या नगरातील लहान बालकांना जवळ अंगणवाडी नसल्यामुळे शिक्षण व संस्कारापासून वंचित रहावे लागत असून त्यांचे बालपण जाग्यावरच खुंटत आहे. या भागात घंटा गाडी येत नाही घनकचरा जागोजागी साचलेला आहे सर्वत्र घाण पसरलेली आहे त्यामुळे येथील नागरिकांचे सतत आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे . येथील बहुतांश नागरिक रोजमजुरी करून आपली उपजीविका भागवित असतात येथील नगरसेवक , उपनगराध्यक्ष , नगराध्यक्ष , मुख्याधिकारी , आमदार , खासदार लक्ष देण्यास तयार नाहीत . तुमची गल्ली अधिकृत नाही याची नोंद नाही , तुम्हाला घरकुल किंवा इतर सुविधा देऊ शकत नाही म्हणून नागरिकांचा अपमान केला जातो . या नागरिकांचे मतदान जमते , येथील नागरिक शहरातील सर्व बांधकामे , रोजगार करतात ते जमते फक्त यांना अधिकार म्हणून रस्ता , पाणी , आरोग्य , शिक्षण या सुविधा देण्याचे जमत नाही अशी येथी अधिकारी आणि पदाधिकारी यांची मानसिकता मानवतेला काळिमा फासणारी ठरलेली आहे . यांना योग्य त्या नागरीकरणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि यांचे जीवनमान उंचावले पाहिजे म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांची दखल घेऊन त्यांच्या रास्त मागणीचे निवेदन मा .मुख्याधिकारी , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , संबंधित नगरसेवक , नगराध्यक्ष यांना देण्यात येऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे . यावेळी आम आदमी पक्षाचे हदगाव तालुकाअध्यक्ष नागोराव गंगासागर , सचिव शिवाजी जोजार , मा विलास कांबळे अनेक स्त्री -पुरुष नागरिक उपस्थित होते . शासन व प्रशासनाच्या कार्यवाहिकडे आता सर्वांनाच लक्ष लागले आहे या बाबतीतही पाठपुरावा करण्याचे वचन आम आदमी पार्टीवतीने नागरिकांना देण्यात आले आहे यावेळी नागरिक समाधानी असल्याचे दिसून आले आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!