उमरखेड येथे मराठा युवा मंच च्या कार्यकर्त्याची बैठक.
उमरखेड येथे मराठा युवा मंच च्या कार्यकर्त्याची बैठक
प्रतिनिधी
उमरखेड :
सकल मराठा समाज प्रणित मराठा युवा मंच उमरखेड तालुक्याचे कार्य करण्याची बैठक नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडण्यात आली
मागील पाच वर्षापासून मराठा युवा आपण च्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थी व इतर घटकांना न्याय देण्यासाठी मराठा युवा मंच कार्य करत असते त्याचाच एक भाग म्हणून मराठा युवा मंच तर्फे मराठा क्रांती भवन व वसतिगृहासाठी बांधकाम करण्याचे सदर बैठकीत ठरविण्यात आले .कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही आरक्षण नसल्यामुळे सद्यपरिस्थितीत त्यांना शिक्षण घेणे परवडेबल नसल्यामुळे व शहरात गरीब कुटुंबांना राहण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे मराठा क्रांती भवन येथे सुसज्ज वस्तीगृह बांधण्याची बांधण्याचा मानस मराठा युवा मंच आहे त्यासाठी जागा दिल्यास किंवा समाजातील घटकांकडून लोकवर्गणीच्या माध्यमातून जागा खरेदी करून त्या ठिकाणी मराठा क्रांती भवन व वस्तीगृहासाठी बांधकाम करण्याचा या बैठकीत ठरवलं यासाठी उमरखेड येथील प्रसिद्ध उद्योजक पुष्पावंती ड्रेसेस चे संचालक प्रमोद देशमुख यांनी आपल्या वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधकाम करण्यासाठी निधी देण्याचे त्यांनी कबूल केले त्यासाठी त्यांचे समाजबांधवा कडून अभिनंदन करण्यात आले .
मराठा युवा मंच तर्फे पुढील काळात समाजाच्या सहकार्याने ही क्रांती भवन बांधू अशा प्रकारचा ठराव या मीटिंगमध्ये घेण्यात आला .यावेळी सभेला .मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती .
You have remarked very interesting points! ps nice website.Blog range