वाढत्या विज लोड शडींग मुळे चार ते पाच दिवस आड होतो पाणी पुरवठा – मरसुळ नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाढत्या विज लोड शडींग मुळे चार ते पाच दिवस आड होतो पाणी पुरवठा – मरसुळ नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी / १६ मार्च
उमरखेड –
मागील एक महिन्या पासुन विज वितरण कंपनीने मरसुळ गांवाला तब्बल सहा तासाचे विज लोड शडींग सुरु केल्याने रोज सुरळीत असलेला सार्वत्रिक पाणी पुरवठा आता विज खंडीत मुळे पाच दिवसं आड पाणी गांवनागरीकांना मिळत असल्याने परिणामी गांवातील हांतपंपाचे दुषीत पाणी प्यावे लागत असल्या ने या पित असलेल्या पाण्यामुळे पोटाच्या विकारात वाढ होऊ लागल्या ने नागरिक मोठ्या प्रभाणात आजारपणा सोसत असल्याने नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे
मरसुळ – बेलखेड , कुपटी – बारा आणि आमदरी या गांवाला एकाच ठिकाणावरून विज जोडणी ठेवल्याने आणि मरसुळ – बेलखेड गावठाण फिटर चे काम सात महिन्यां पासुन अर्धवट अवस्थेत ठेवल्या गेल्याने शेतातील कोवळी पिके धोक्यात आली आहे वारंवार त्रिरीफेज विज खंडीत राहत असल्याने पिठगिरण्या , सार्वत्रिक पाणी पुरवठा बंद ठेवावा लागत आहे मरसुळ गांवातील पाणीपुरवठा करनाऱ्या विहिरी मध्ये मुबलक पाणी साठा आहे मात्र विजळ नाही या मुळे हा नाहक त्रास गांवकऱ्यांना सहन करावा लागत आहे
पाच गांवाना विज भार कमी पडतो असे वारंवार विज वितरण व्यवस्थापना कडुन सांगण्या त येते मात्र यावरळ उपाय केल्या जात नाही हि एक कंपनी ची शांकातिका बनली आहे येथील कंत्राटदार यांनी अगोदर पोल – तार ओढुन ठेवले हे काम सुरळीत सुरु असतांना जुर्ले महिन्यात संबंधित ठेकेदारांचे गावठाण फिटर उभारणी च्या कामात अचानक खंड पाडण्यात आला याचे कारण अद्याप हि समजु शकले नाही विज भार कमी असतांना आणि तांत्रिक दृष्टया बाजू दुबळी असतांना मरसुळ – बेलखेड प्रवाशी थांब्या लगत असलेल्या लोहमार्ग कंत्राटदार यांना विजेची जोडणी कोणत्या निकषांवर केली हा मोठा प्रश्न समोर येऊ लागला आहे यांची चौकशी आमदार किसन वानखेडे आणि उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे यांनी सखोल पणाने करावी म्हणजे विज वितरणचा कारभार लक्षात येईल असा प्रश्नं त्रासालेल्या पाच गांवच्या सरपंचा सह विज ग्राहकांकडून होतो आहे
—————————-
– कोट –
तत्कालीन उर्जा मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विज उपेक्षित पाच गांवाना सुरळीत विजपुरवण राहावा म्हणून मरसुळ येथे ३३ के व्ही विज उप केंन्द्राला मंजुरी दिली होती , उमरखेड – महागांव आणि उप तालुका ढाणकी येथील सर्वांना विज साहित्य व वारंवार विज प्रश्न भेडसावत असल्याने उमरखेड येथे कार्यकारी अभियंता या सह वाढीव कर्मचारी पद भरती होने यासह या ठिकाणी विधान सभा अतर्गंत विज महावितरण विभागीय कार्यालय तत्काळ निमिर्ती साठी आपण विधान भवनात सुरु असलेल्या आर्थिक बजेट अधिवेशनात समस्या निरासरांसाठी पाठपुरावा म्हणून लक्ष वेधी मांडणार . . !
– किसन वानखेडे
आमदार , उमरखेड विधान सभा
—————————-
जिल्हा पालकमंत्री ना संजय राठोड हे नागापुर ( प ) येथे आले असतांना ना राठोड यांचे कडे मरसुळ येथील सरपंच मनोज कुबडे आणि पाच हि गांवच्या निवडक नागरिकानी विज समस्या निकाली काढण्यासाठी निवेदन देऊन या बाबतीत मागणी केली होती मात्र अद्याप पर्यंत त्या बाबतीत दखल झालेली दिसत नसल्याने यातना भोगत नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे
————
Pharmazee I really like reading through a post that can make men and women think. Also, thank you for allowing me to comment!
PrimeBiome I just like the helpful information you provide in your articles
Mitolyn naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.