श्री शिव महापुराण कथा व विश्वशांती दत्त यागाचा भव्य दिव्य सोहळा यशस्वी संपन्न पिंपळगाव,भोकर (प्रतिनिधी) –

श्री शिव महापुराण कथा व विश्वशांती दत्त यागाचा भव्य दिव्य सोहळा यशस्वी संपन्न
पिंपळगाव,भोकर (प्रतिनिधी) –
पिंपळगाव येथील श्री दत्त संस्थानच्या वतीने आयोजित श्री शिव महापुराण कथा व १०८ कुंडी विश्वशांती दत्त याग सोहळा दि. ६ ते १३ मार्च दरम्यान मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या अद्वितीय, अलौकिक आणि अविस्मरणीय सोहळ्यात सुमारे १४ लाख भाविकांनी कथा, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला, तर २८०० दाम्पत्यांनी विश्वशांती दत्त यागामध्ये सहभाग नोंदवला.
भाविकांची अलोट गर्दी – अध्यात्मिकतेचा महासंगम
या सोहळ्यासाठी हजारो साधू-संत, शिवाचार्य, महंत तसेच हिंदू धर्मातील शैव, वैष्णव आणि दत्त पंथीय एकत्र आले. बालयोगी गजेंद्र महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी विदर्भ, मराठवाडा तसेच तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक हजर होते. मंडपाची जागा अपुरी पडल्याने हजारो भक्तांनी मंडपाबाहेर बसूनही कीर्तनाचा आनंद घेतला.
महाप्रसादाची भव्य व्यवस्था
सोहळ्यादरम्यान दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत होते. सांगतेच्या दिवशी विशेषतः १०० क्विंटल शुद्ध देशी गीर गायीच्या तुपातील बुंदी प्रसाद स्वरूपात वितरित करण्यात आली. चपाती, वरण, भात, भाजी आणि गोड पदार्थ असा भरगच्च महाप्रसाद रोज ८५ क्विंटल पिठाच्या चपात्यांसह बनवण्यात आला.
भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य तपासणी आणि सुविधा
यंदाच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ११ हजार भाविक भक्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रामेश्वर भाले व त्यांच्या टीमने दवाखाना आणि अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली.
राजकीय नेत्यांचा मोठा सहभाग – आध्यात्मिकतेला प्रोत्साहन
या सोहळ्यात खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार सुभाष वानखडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पिठाधीश्वर व्यंकट स्वामी महाराज यांनी राजकीय नेत्यांनी आध्यात्मिकतेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
वाहतूक व सुरक्षेची काटेकोर व्यवस्था
सोहळ्याच्या दरम्यान राजवाडी ते येवली तांडापर्यंत ६ किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक आमदार, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या मदतीने वाहतूक व स्वच्छतेची उत्कृष्ट व्यवस्था ठेवण्यात आली.
भव्य सोहळ्याची यशस्वी सांगता – सर्वांचे योगदान उल्लेखनीय
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये मलूक पिठाधीश्वर तथा कथाकार प. पु. राजेंद्रदास जी महाराज, धिरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम), माता कणकेश्वरी जी, राधाकृष्ण जी, तसेच उज्जैन, केदारनाथ, श्रीशैल येथील साधू-संत उपस्थित होते.
गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी यावेळी सांगितले की, “धर्माला राजश्रय आणि राजाला धर्माची जोड असल्याशिवाय धर्म वृद्धिंगत होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी आध्यात्मिकतेला प्राधान्य द्यावे.”
विशेष योगदान व सहभाग
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार किशनराव वानखडे, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांचा मोठा सहभाग होता.
समारोपाचा संदेश – एकात्मतेचे दर्शन
या सोहळ्यात शैव, वैष्णव आणि दत्त पंथीयांनी एकत्र येऊन कार्य केले, यात कुठलाही भेदभाव नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रभर या सोहळ्याची चर्चा असून भक्तीमय वातावरणात हा ऐतिहासिक सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.
Puraburn Hi there to all, for the reason that I am genuinely keen of reading this website’s post to be updated on a regular basis. It carries pleasant stuff.
Tech dae very informative articles or reviews at this time.