प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने एस.पी.निखिल पिंगळे याचे स्वागत.
- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने लातूरचे एस.पी.श्री निखील पिंगळे यांचे स्वागत .
पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिद हुतात्म्यांना अभिवादन
लातूर : जनतेच्या रक्षणासाठी २४ तास सज्ज असणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे पोलीस. लातूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेशी नवीनच रूजू झालेले पोलीस अधिक्षक श्री. निखिल पिंगळे यांची पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष निर्भिड संपादक विष्णू आष्टीकर, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष ज्येष्ठ संपादक लहुजी शिंदे, शहराध्यक्ष अभ्यासू संपादक नितीन भाले, पत्रकार सोनवने आदीनी भेट घेऊन स्वागत केले व पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिद पोलीसाना अभिवादन करून विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पोलीस आणि पत्रकार यांचा संवाद असेल तरच लोकशाही जिवंत राहील. श्री. निखिल पिंगळे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून रूजू झाले आहेत. त्यांच्यामुळे लातूर जिल्ह्यातील महिला सुरक्षित राहतील, सामान्य जनतेला न्याय मिळेल, विशेष म्हणजे पत्रकार सुरक्षित राहतील, अवैध धंद्याना आळा बसेल अशी अपेक्षा आहे. पोलीसांचं जीवन कसं असतं? दसरा आला पोलीस, दिवाळी आली पोलीस, होळी आली पोलीस, ईद आली पोलीस, जयंती आली पोलीस, पूर आला पोलीस, परीक्षा आली पोलीस, नेते आले पोलीस, भांडण झालं पोलीस, मोर्चा आला, आंदोलन झालं पोलीस, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सर्व ॠतूत जनतेच्या सेवेसाठी तैनात, शनिवार रविवार सर्वाना सुट्टी पोलीस मात्र ड्युटीवर, मुलांचा वाढदिवस तरी ड्युटी, स्वतःचा वाढदिवस तरी ड्युटी, मुलं, पत्नी, आई-वडील आजारी तरी ड्युटी आपल्या रक्षणासी २४ तास तैनात राहून देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या हुतात्म्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे वतीने शतशः नमन.
Very interesting topic, thanks for putting up.Blog range