उमरखेड येथे तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या.
उमरखेड येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या..
[ आत्महत्या नसून हत्या असल्याचा नातेवकांचा आरोप : आरोपी आर. सी.पी. कर्मचारी विजय हाटकर याला पोलिसांनी घेतले ताब्यात ]
प्रतिनिधी उमरखेड :- शहरातील मध्यभागी असलेल्या वसंत नगर येथील बारस्कर टेलर यांच्या घरी भाडे तत्वावर असलेला आर. सी. पी. पथकातील पोलीस कर्मचारी विजय हाटकर यांच्या घरी दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 : 42 मी आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक मुलगी गंगा संजय कोरडे वय 20 वर्षे रा.वेणी मु.पो. हर्षी ता. पुसद जि. यवतमाळ हिला नोकरीचे अमिश दाखवून उमरखेड येथे बोलावुन घेतले व तिच्यावर अत्याचार करून तिला फासावर लटकविल्याची फिर्याद मृतक गंगा कोरडे यांचे वडील संजय कोरडे यांनी पोलिसांना दिली.
तरुणीला शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. आरोपी विजय हाटकर हा विवाहित असून त्याला दोन अपत्य असल्याची व त्याच्यावर कलम 498 ची केस न्यालायत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी विजय हाटकर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतक गंगा कोरडे यांच्या वडिलांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल माळवे विनीत घाटोळ, संदीप ठाकूर हे करीत आहेत.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.