संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या चुरशीच्या निवडणुकीत राम देवसरकर विजयी.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या चुरशीच्या निवडणुकीत राम देवसरकर विजयी
उमरखेड :-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत व्यवस्थापन सदस्य प्रतिनिधी म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती आणि यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर विजयी झाले आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळासह अनेक प्राधीकरणाची निवडणूक रविवारी, २० नोव्हेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत राम देवसरकर यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात उभे होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्वत परिषद ( अकॅडेमिक कौन्सिल) आणि अभ्यास मंडळांच्या या विविध प्राधीकरणांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार उभे राहिल्याने चुरस निर्माण झाली होती.
विद्यापीठाच्या सिनेटवर पदवीधर, महाविद्यालयीन शिक्षक, प्राचार्य आणि व्यवस्थापनाचे सदस्य विविध मतदार संघात निवडून द्यायचे असतात.
विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि व्यवस्थापनाचे विविध प्रश्न व समस्या सिनेटच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची आणि सर्वांनी भरभरून सहकार्य केल्यामुळेच ही निवडणूक जिंकल्याची भावना याप्रसंगी राम देवसरकर यांनी व्यक्त केली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेच्या संलग्न विद्यालय, महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी राम देवसरकर यांचे अभिनंदन केले आहे.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/uk-UA/register?ref=WTOZ531Y