निंगनूर परिसरात सागवानाचा अवैध व्यवसाय जळतन बीटीच्या नावाने वृक्षांची कतल उमरखेड

youtube

 

निंगनूर परिसरात सागवानाचा अवैध व्यवसाय जळतन बीटीच्या नावाने वृक्षांची कतल

उमरखेड

जळतन बीटीच्या नावाखाली राजरोसपणे जंगलातील परिपक्व झालेल्या सागवान वृक्षांची कत्तल करून जंगल नेस्तनाबूत केले जात आहे. महागाव वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) कार्यालयाच्या कार्यकक्षेतील फुलसांगवी जवळील निंगनूर जंगल परिसरात हा अवैध व्यवसाय फोफावला असल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर गोपनीय मेसेज द्वारा मिळाली. माहिती पुसद येथील चौकशी पथक निंगनूरसह किनवटकडे येणार असल्याचे सूत्रांकडून ऐकायला मिळाले. या सागवान बिट्टीच्या लाकडाची गोलाई ३५ सेंटीमीटरच्या आत असायला पाहिजे; परंतु ६०-७० सेंटीमीटर आकारापेक्षा जास्त गोलाई असलेल्या लाकडाला जळतन बीटीचे नाव देऊन थोडेफार मालकी पट्ट्यातील म्हणा किंवा अन्य वैध लाकूड वाहतूक पासेसपुरते खरेदी करून त्या पासेसच्या नावावर हे लाकूड सर्रास लांबवले जात आहे. फोटो तिल सागवान वृक्षाची गोलाई मोठया स्वरूपात दिसुन येते . वनविभागातील शुक्राचार्याशिवाय लाकूड तस्करांचे एवढे धाडस होऊच शकत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्तविली.

बाँक्स

आमचा तपास सखोल सुरू आहे जे काही निष्पन्न झाले ते समोर येईल सध्या तरी काही निष्पन्न झाले नाही आमची चौकशी सुरू आहे अशी प्रतिक्रिया फिरत्या पथकाचे आर एफ ओ शेख मुखबीर यांनी नारीशक्ती न्यूजला कळवले आहे

 

 

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!