निंगनुर येथे मोहरमनिमित्त शांतता बैठक संपन्न

निंगनुर येथे मोहरमनिमित्त शांतता बैठक संपन्न
प्रतिनिधी निगंनुर :-
आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता निगंनुर ग्रामपंचायत कार्यालयात मोहरम निमित्ताने बिटरगावचे पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी बिटरगाव पो स्टे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी मोहरम उत्सवाचे औचित्य साधून निंगनूर येथे शांतता समितीची बैठक घेऊन गावकऱ्यांना मोहरम उत्सव सर्व समावेश पद्धतीने गुण्यागोविंदाने साजरा करावा असे आवाहन केले . यावेळी सरपंच , माजि सोसायटी अध्यक्ष , जामा मजिदचे अध्यक्ष. तसेच निगंनुरचे बिटजमादार रवी गिते .पो.काँ.हिम्मत जाधव. व गोपनीय प्रकाश मुंडे व गावातील प्रतिष्ठीत नागरिक व मोहरम उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते .