महागाव येथे ‘एकता पत्रकार संघ’ची कार्यकारिणी गठित अध्यक्ष एस के शब्बीर उपा अध्यक्ष किशोर राऊत
महागाव येथे ‘एकता पत्रकार संघ’ची कार्यकारिणी गठित अध्यक्ष एस के शब्बीर उपा अध्यक्ष किशोर राऊत
महागाव
महागाव तालुक्यात पत्रकारांच्या हक्क, एकता व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संघटनेची स्थापना एकता पत्रकार संघ महागावच्या अध्यक्षपदी ct india News चैनल चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर. तर उपाध्यक्ष किशोर राऊत यांची निवड.
तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटित प्रयत्न करणे तसेच पत्रकारितेतील नैतिक मूल्ये जपणे या उद्देशाने ‘एकता पत्रकार संघ, महागांव’ या नव्या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त आज दि. ०२ जून २०२६ रोजी मंगळवारी महागांव विश्रामगृहात आयोजित या बैठकीत संघटनेची कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली.
बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकार संरक्षण, सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, पत्रकारांचे प्रशिक्षण, तसेच पत्रकारांमधील ऐक्य व समन्वय वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी एस. के. शब्बीर व तसेच उपाध्यक्ष किशोर राऊत यांची निवड सदस्य लखन लोंढे तर संजय नागरगोजे यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली. तसेच प्रवीण कावळे आणि रविराज कावळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांमध्ये परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि व्यावसायिक मूल्यांची जपणूक करून समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या शेवटी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. महागांव तालुक्यातील पत्रकारांना एकत्र आणून संघटित शक्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘एकता पत्रकार संघ, महागांव’ ही संघटना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.


The APK installation was a breeze. Everything works perfectly on my Android phone. Get your plus777downloadapk here.
A really solid platform with a great selection of bets. Everything feels secure and the user experience is spot on br16betcom
I’ve been looking for a reliable platform like this for a while. The interface is super smooth and everything works perfectly. Definitely check out bdjoya9apps if you want a hassle-free experience!
The registration was so quick and the welcome bonus is actually generous. I am really enjoying the slot variety here. Definitely visit 55vip777loginregister to get started.