शिवसेना कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करणारे चार आरोपी जेरबंद
शिवसेना कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करणारे चार आरोपी जेरबंद
प्रतिनिधी / १८ जुन
उमरखेड –
शहरातील शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत उमरखेड पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन असून उर्वरित तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१६ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजता रमेश गुलाबसिंह चव्हाण (वय ६० वर्षे, रा. हनुमान वॉर्ड, उमरखेड) हे दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना सी.ओ. यांच्या शासकीय बंगल्याजवळ तीन अज्ञात इसमांनी स्कुटीवर येऊन त्यांना अडविले आरोपींनी तोंडाला रुमाल बांधलेले होते त्यांनी लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या पायावर वार करून गंभीर दुखापत केली तसेच चाकूने गळ्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), २९६, १२६(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हुनमंत गायकवाड यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करून आवश्यक सूचना दिल्या पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ , डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक तपास, पुरावे संकलन आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली
आरोपींनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटविणे हे मोठे आव्हान होते मात्र, डी.बी. पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींचा माग काढला आरोपी यवतमाळहून तेलंगणा राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून सर्व आरोपींना ताब्यात घेतले
गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी
सय्यद आरीफ उर्फ धार सय्यद युसूफ (वय २७ वर्षे, रा. सचिननगर, उमरखेड)
, अहेफाजोद्दीन उर्फ गौसोद्दीन मुज्जुमोददीन काझी (वय २६ वर्षे, रा. सुकळी, ता. उमरखेड)
, दानीशोददीन अहेनुददीन काझी (वय १८ वर्षे, रा. तातरशहा वॉर्ड, उमरखेड)
तसेच एक अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस चौकशीत आरोपींनी हा हल्ला परवेझ उर्फ लाला सलीम खान, रा. उमरखेड यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे तसेच आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याचेही तपासात समोर आले आहे या प्रकरणात पुढील अटक व रिमांडची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली
गुन्ह्यातील कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हुनमंत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या माध्यमातून पार पडली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे, डी.बी. प्रमुख शरद लोहकरे, सहाय्यक फौजदार मधुकर पवार, पोलीस हवालदार चंदन जाधव, संदीप ठाकूर, अतुल तागडे, पोलीस नाईक संतोष राठोड तसेच पोलीस कर्मचारी दिगांबर गिते, संघशील टेंबरे, संदीप जाधव आणि अंकुश दरबस्तेवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती
अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे
सोबत –
फोटो



