२००१ ते २०१७ मधील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्या मुळावा परिसरातील शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; जुन्या पीक कर्जदारांना न्याय देण्याची मागणी उमरखेड – महाराष्ट्र शासनाने विविध कालावधीत
२००१ ते २०१७ मधील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्या
मुळावा परिसरातील शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; जुन्या पीक कर्जदारांना न्याय देण्याची मागणी
उमरखेड –
महाराष्ट्र शासनाने विविध कालावधीत राबविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (२०१७), महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०१९) तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०२६) अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी सन २००१ ते २०१७ या कालावधीत सोसायटीचे पीक कर्ज घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कोणत्याही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त करत मुळावा परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मध्ये २०१७ नंतरच्या कर्जदारांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र २००१ ते २००९ तसेच २००९ ते २०१७-१८ या कालावधीत सोसायटीकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या कालावधीतील हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा कायम आहे.
नैसर्गिक आपत्ती, नापिकी आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशा परिस्थितीत जुन्या पीक कर्जदारांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
म्हणूनच सन २००१ ते २०१७-१८ या कालावधीत सोसायटीमार्फत पीक कर्ज घेतलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत समावेश करून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी ५ ऑगस्ट च्या मागणी तून कृषिजिवी शेतकरी संघ यांच्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ , तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांनाही पाठविण्यात आल्या असून शासनाने या मागणीची दखल घेऊन जुन्या कर्जदार शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे कृषिजीवी शेतकरी संघ उमरखेड यांनी ५ ऑगस्ट रोजी राज्य सरकार कडे अशी अपेक्षा या सह मुळावा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Nice blog here! Additonally yokur weeb sjte lots upp verfy fast!
Whatt webb holst are youu thee usagee of? Cann I aam getting yoour affilate lin inn your
host? I deszire myy webdite loaaded uup aas quickly aas ykurs llol xnxx
Logging in is a breeze and the account management is very straightforward. No complicated steps, just pure gaming. I really appreciate the efficiency of sz777asialogin.
Really impressed with the quality and the service here. Everything is handled professionally and the results are noticeable. Great job team! Visit phnutristar