बालमित्र व मैत्रिणी चा 20 वर्षांनी रंगला स्नेहमेळावा पूर्णा येथे
बालमित्र व मैत्रिणी चा 20;वर्षांनी रंगला स्नेहमेळावा पुर्णा येथे
पुर्णा...
रेल्वे हायर सेकंडरी स्कूल (म.मा )पूर्णा जंक्शन जिल्हा परभणी स्नेहमेळावा -हा मानव कम्प्युटर तर येथे आयोजित करण्यात आला होता. माध्यमिक विद्यालयातील् सन 1999 मधील बॅच् च्या सातवी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. 15 मे रोजी संपन्न झाला.तब्ब्ल 20 वर्षानंतर मित्र – मैत्रिणीसह शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
स्नेहमेळाव्या निमित्त व्यवसाय,नोकरी,पत्रकारिता विविध क्षेत्रातील कामानिमित्त, दुरावलेले मित्र- मैत्रिणी यानिमित्त एकत्र आले.गप्पा गोष्टी हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
कार्यक्रमानिमित्त् सर्वांना एकत्र आणण्यासाठी सोशल मिडीयाचा चांगलाच हातभार लागला. सचिन खंडागळे व निलेश धामनगावे याने सर्व मुलांना व वंदना, स्मिता जमधाडे हिने सर्व मुलींना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रामाच्या वेळी माजी विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त व्यक्त करत जुन्या आठवणी ताज्या केल्या.तसेच शिक्षकांनीही आपल्या बोलण्यातून शाळेचे वातावरण,त्यावेळेसची व आजची शिक्षणपद्धती,विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या पिढीमध्ये झालेले बदल,माणुसकी,आपुलकी,एकी, स्नेहबंध,ऋणानुबंध,कौटुंबिक व व्यवसायिक जीवन याविषयी आपापली मते व्यक्त केली.खय्यूम भाऊच्या घरी सर्व ना बोलावून ईद सादरी केली तसेच शीरखुर्मा सगळ्यांना देण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प.तसेच विद्यालयाचे विदयार्थी यांना रेल्वे हायर सेकन्डरी स्कुल चे सन्मान चिन्ह वाटप केले व वंदना यांच्या हस्ते पेन देऊनविशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाहुणे हर्षवर्धन बागुल …… होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वदना सोनुले आभारप्रदर्शन वैशाली गावाडे. राखी पट्टेकर हिने केले.
या कार्यकमाच्या वेळी माजी विद्यार्थ्यांमधून वंदना पराते,सचिन खंडागळे ,सविता चंंद्रे पत्रकार .निलेश धामनगावे ,सुधीर जाधव, विजय धुमाळे, राजू भिसे, विलास खारे, विलास सावळे, रवी कमलकर, रवी खंदारे,महेंद्र खरे, खय्यूम, नूर,यांनी मनोगते वक्त केली.
यावेळी माजी विदयार्थी व विद्यार्थिनी उपस्थित मोठया प्रमाणात होते.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/en/register?ref=JHQQKNKN