माहेश्वरी महिला मंडळा कडुन हळदी कुकंवाचा कार्यक्रम संपन्न
माहेश्वरी महिला मंडळा कडुन हळदी कुकंवाचा कार्यक्रम संपन्न
उमरखेड –
नवीन वर्षाच्या सुरुवातीस सण म्हणजे मकर संक्रांति आणि हा मकर संक्रांत महिन्यामध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम हा पंधरा ते वीस दिवस सुरू असतो व माहेश्वरी महिला मंडळ कडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा राजस्थानी भवन येथे आयोजित करण्यात आला तसेच राधाकृष्ण,विठ्ठल रूकमीनी, झोपडी विविध देखावा करून अशी विविध देखावे करण्यात आले व मातेच्या पूजन करून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात व प्रत्येक येणाऱ्या महिलेला हा जो कुंकवाचा वान म्हणून रिकामी प्लास्टिक ची कुंडी ही देण्यात आली की प्रत्येक महिलांनी आपल्या या कुंडीमध्ये एक वृक्षाचे झाड या महिन्यामध्ये लावून त्याची योग्य देखभाल करून त्या झाडाची काळजी घ्यावी व आज आपल्याला जे ऑक्सिजन मिळते ते आपल्याला झाडापासूनच मिळते असे या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कुंडी देऊन असे महिला मंडळ कडून सांगण्यात आले यावेळी सर्व माहेश्वरी महिला मंडळ उपस्थित होत्या.



