नगरपरिषद निवडणूक शांतता पुर्वक काटेकोरपणे पार पाडा – निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे पत्रकार परिषद संपन्न उमरखेड –

youtube

नगरपरिषद निवडणूक शांतता पुर्वक काटेकोरपणे पार पाडा
– निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे पत्रकार परिषद संपन्न

उमरखेड –
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी ।साठी नामांकन प्रक्रिया १० नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी सर्व निरंक नामांकन प्राप्त झाले आहेत उमरखेड शहरातील एकूण मतदार संख्या ४० हजार ६७० असून त्यामध्ये पुरुष मतदार २० हजार ५६० आणि महिला मतदार २० हजार ११० आहेत
निवडणुकीसाठी मतदान केंद्रे ठरवण्यात आली आहेत उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रत सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्र स्विकारण्यासाठी प्रभाग निहाय ६ पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी माहिती आयोजित न प कार्यालय पत्रकार परिषद मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली
शांतता पूर्वक व काटेकोर पणे या निवडणुकी मध्ये पालन करने अंत्यत महत्वाचे आहे असे मुळे पुढे म्हणाले , मतदारांना प्रमाणपत्रे, सुविधा आणि मार्गदर्शन देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जात आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी साहित्य वितरणाची व्यवस्था नगरपरिषद उमरखेड मंगल कार्यालयाच्या तळमजल्यावर करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली आहे. यामध्ये २ भरारी पथक, १ व्हिडिओ पाहणी पथक आणि इतर पथकांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७ : ३० ते सायंकाळी ५ : ३० दरम्यान मतमोजणी होईल या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजय कुरवाडे गट विकास अधिकारी किरण कोळपे , रोहित शिंदे अधिकारी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!