उमरखेड येथील एमआयडीसीतील साई ऍग्रो इंडस्ट्रीज रात्री अचानक जळून खाक

youtube

उमरखेड येथील एमआयडीसीतील साई ऍग्रो इंडस्ट्रीज रात्री अचानक जळून खाक

उमरखेड

उमरखेड ते ढाणकी रोडवर असलेल्या एमआयडीसी मधील साई ऍग्रो इंडस्ट्रीज या बग्यास कंपनीला आज दिनांक 16 ला मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली,लागलेल्या आगिने रौद्ररूप धारण करून संपूर्ण बग्याससाठी लागणारे कुटार हे जळून खाक झाले असून याची माहिती रात्री दोन वाजता मिळाल्यामुळे तात्काळ उमरखेड नगरपरिषदेतील अग्निशामक दलाला प्राचारण करून आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केला हि आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उमरखेडसह, हदगाव, पुसद, नांदेड येथील अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझविण्याचे काम चालू आहे यामध्ये आग कशाने लागली आणि किती नुकसान झाले हे अजून पर्यंततरी कळाले नसून त्याचा तपास उमरखेड पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!