उमरखेड नगरपरिषदेत नवे नेतृत्व, नवी दिशा ; नगराध्यक्ष तेजश्री जैन यांच्यासह १७ नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न उमरखेड –
उमरखेड नगरपरिषदेत नवे नेतृत्व, नवी दिशा ; नगराध्यक्ष तेजश्री जैन यांच्यासह १७ नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न
उमरखेड –
उमरखेड शहराच्या राजकीय इतिहासात आज एक महत्त्वाचा व निर्णायक क्षण नोंदवला गेला. उमरखेड नगरपरिषद येथे नवनिर्वाचित तेजश्री संतोष जैन यांनी नगराध्यक्षपदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली, तर त्यांच्यासह एकूण १७ नगरसेवकांनी पदाची सुत्रे घाती घेतली नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व भव्य वातावरणात हा पदग्रहण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला उमरखेड शहरातील नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तसेच विविध राजकीय पक्षांचे स्थानिक व जिल्हास्तरीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचीही लक्षणीय उपस्थिती यावेळी दिसून आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड शहर काँग्रेस कमिटीचे जेष्ठ पदाधिकारी नंदकिशोर अग्रवाल होते.यावेळी तातू देशमुख, रामदेवसरकर, साहेबराव कांबळे, ॲड संतोष जैन, इनायतुल्ला जनाब, बाळासाहेब नाईक, ॲड संजय जाधव, सतीश नाईक, गोपाल अग्रवाल, आत्माराम शिंदे, सुभाष दिवेकर, ॲड. बळीराम मुटकुळे, डॉ. अजय नरवाडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली होती
पदग्रहण सोहळ्यापूर्वी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर एक आगळावेगळा व लक्षवेधी क्षण अनुभवायला मिळाला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व जनशक्ती पॅनलचे १७ हि नगरसेवक हे महामंडळाच्या बसमधून पदग्रहण स्थळी दाखल झाले. या कृतीतून सामान्य जनतेशी असलेली नाळ, तसेच लोकशाही मूल्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, हा पदग्रहण सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता उमरखेडच्या आगामी विकासाची दिशा ठरवणारा मैलाचा दगड ठरला आहे. नागरी सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेच पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्ष तेजश्री जैन म्हणाल्या, नगरसेवक, प्रशासन व नागरिक यांना सोबत घेऊन उमरखेडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. शहरातील प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देत लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.
एकूणच, नव्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहणामुळे उमरखेडच्या राजकारणात नवी ऊर्जा संचारली असून, हा सोहळा केवळ उमरखेडपुरताच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातही एका नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.




Been using 2ez bet for a little while now. I found some good deals on the sports I like. Give them a shot and see for yourself, and join their community 2ez bet.