उमरखेड येथे लवकरच होणार अद्यावत ‘ ऑक्सीजन – पार्क भाजपा जिल्हाध्यक्ष भुतडा यांच्या पाठपुराव्याला यश.

उमरखेड येथे लवकरच होणार अद्यावत ‘ ऑक्सीजन – पार्क भाजपा जिल्हाध्यक्ष भुतडा यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी
उमरखेड :
उमरखेड शहरालगत असलेल्या अंबोवन तलाव येथे अद्यावत सोयी सुविधायुक्त ऑक्सीजन पार्कची उभारणी करण्याकरीता १० कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली असून शासनाने वनविभाग उमरखेडला प्रस्ताव सादर करण्याचे सांगीतले आहे .
मागील वर्षभरापासून हा प्लांट अंबोवन तलावानजीक असलेल्या उद्यानात उभारावा यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा यांनी प्रादेशिक वनविभाग उमरखेड येथे ऑक्सीजन पार्क करिता निधीची मागणी मंत्री वने व सांस्कृतीक कार्य मत्स्यव्यवसाय सुधीर मुनगंटीवार यांचेकडे करीत पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल प्रादेशिक उमरखेड यांना सुचीत करण्यात आले असून शासन प्रचलीत नियमानुसार प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे . मंत्रालयातून हे निर्देश कार्यालय अधिक्षक, उपवनसंरक्षक पुसद वनविभाग यांना देण्यात आल्याने हि . मु . राठोड यांनी तसे उमरखेड वनपरीक्षेत्र अधिकारी ( प्रा ) यांना आदेशीत केल्याने लवकरच अंबोवन तलावानजीक ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे .
चौकट :
सदर ऑक्सीजन पार्कसाठी श्रेत्र पाहणी सुरु असुन जागा निश्चित झाल्यानंतरच विस्तृत प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात येईल . यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे .
एस . एस . पांडे
वनपरिक्षेत्र अधिकारी , उमरखेड वनविभाग ( प्रा )
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.info/sk/register?ref=OMM3XK51
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/cs/register?ref=S5H7X3LP
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!