नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदी अनिल भाऊ बजरंग राठोड यांची निव

youtube

 नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदी अनिल भाऊ बजरंग राठोड यांची निवड

उमरखेड.(प्रतिनिधी):-

नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदी मा.अनिलभाऊ बजरंग राठोड यांची निवड करण्यात अली .
देशात निस्वार्थपणे सामाजिक, विकासात्मक कामे करणारी एकमेव चळवळ अर्थात नवनिर्माण बंजारा क्रांती सेना. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुकेश राठोड ,राष्ट्रीय महासचिव संजय नाईक ,प्रदेश अध्यक्ष रमेश चव्हाण ,कार्यअध्यक्ष सचिन राठोड, महिला प्रदेश अध्यक्ष आशाताई राठोड यांच्या समक्ष व लेखी आदेशाने देशातील बंजारा समाजातील तरुण पिढीचे आदर्श, प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारे व सर्वांना सोबत घेऊन संघटनेच्या माध्यमातून विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणारे, जानकार व्यक्तिमत्व अनिलजी बजरंग राठोड यांची राष्ट्रीय नवनिर्माण बंजारा क्रांती सेना विदर्भ प्रसिद्धी प्रमुख तथा  प्रभारी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल राठोड हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची माहिती असणाऱ्या जाणकार व्यक्तीची  नियुक्ती झाल्याने समाज बांधवाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नवनियुक्त  अनिल राठोड हे सर्वप्रथम पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज, आई जगदंबे, बामनलाल महाराज, संत रामराव महाराज, सामकी आई, जेतालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. बंजारा धर्मगुरु व सर्व महंतांचे आशीर्वाद घेऊन आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. देशातील समाज बांधव व अनेक चाहत्यांनी राठोड यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!