लोकनेते ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीदिनी गहिवरला जनसागर उमरखेड, 

youtube

लोकनेते ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीदिनी गहिवरला जनसागर

उमरखेड,
लोकनेते ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या हृद्य आठवणींनी जनसागर गहिवरला. दि. १ जुलै रोजीच्या जयंती निमित्त येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात प्रतिमापूजन अभिवादन आणि प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ॲड. अनंतराव देवसरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील शिक्षक राजू शिंदे, संगीत शिक्षक सौ. लांजेवार मॅडम, डॉ. श्रीराम शिंदे, तबला वादक प्रकाशराव राणे, दिघडी यांनी भजने, भक्तिगीते व भावगीतांतून कै. ॲड. अनंतरावजी देवसरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रा. डॉ. अभय जोशी यांनी प्रार्थना सादर केली.
जेठमलजी बंग, तातु देशमुख, दत्तराव शिंदे, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कदम, उमरखेड नगर परिषदेच्या अध्यक्ष सौ. तेजश्री जैन, नंदकुमार अग्रवाल, नितीन भुतडा, सुभाषराव शिंदे, ॲड. विलासराव देवसरकर, सोनू खतीब, गोपाल अग्रवाल यांच्यासह उमरखेड, महागाव तालुका आणि परिसरातील शिक्षण, राजकीय, सहकार, विधी, सामाजिक संघटना, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत, उपाध्यक्ष संभाजीराव नरवाडे, सर्व पदाधिकारी आणि संस्थेद्वारा संचालित सर्व महाविद्यालय, विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य नागरिक, पालक, पत्रकार उपस्थित होते.
गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम आणि प्रा. डॉ. पी. वाय. अनासाने यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

3 thoughts on “लोकनेते ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीदिनी गहिवरला जनसागर उमरखेड, 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!