जंतर-मंतरवरवरील क्रुर हल्लेखोरांवर कांग्रेसची कार्यवाहीची मागणी पंतप्रधानांच्या माफीसह शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचीही मागणी ; उमरखेड कांग्रेसचे एसडीएम मार्फत राष्ट्रपतींना निवेदन उमरखेड :
जंतर-मंतरवरवरील क्रुर हल्लेखोरांवर कांग्रेसची कार्यवाहीची मागणी
पंतप्रधानांच्या माफीसह शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचीही मागणी ; उमरखेड कांग्रेसचे एसडीएम मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
उमरखेड :
नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान, झालेल्या कथित क्रुर हल्लेखोरांवर कार्यवाही करा. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेची माफी मागावी. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील, दडपशाही कारवाईचा निषेध उमरखेड कांग्रेसच्या वतीने करण्यात आला. अशा आशयाचे निवेदन एसडिओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, २१ जुलै २०२६ रोजी देशभरातील विद्यार्थी शैक्षणिक हक्क, रोजगाराच्या संधी आणि भविष्यासंदर्भातील मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. मात्र दिल्ली पोलिसांनी केलेला क्रूर लाठीहल्ला हा लोकशाही मूल्यांना धक्का देणारा प्रकार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील कथित कारवाई ही विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनाद्वारे काँग्रेसने नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, आंदोलनादरम्यान कथित गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, तसेच देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील दडपशाही कारवाईचा, तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि अशा प्रकारच्या दडपशाहीच्या घटना थांबवाव्यात, अशा सात प्रमुख मागण्या, कांग्रेसकडून केंद्र सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणी केंद्र सरकारने लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी करत उमरखेड काँग्रेसने या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी माजी प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, शहर अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, तालुका अध्यक्ष अनिल कदम, गोपाल अग्रवाल, युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सोनु खतीब, दत्तराव शिंदे, खाजा कुरेशी, सुधाकर लाहेवार, साहेबराव खडसे, उत्तम पांडे, प्रकाश शिकारे, रसुल पटेल, शिवाजी वानखेडे, गजानन देशमुख, अभय पवार, गजानन रासकर, कैलास राऊत, विरेंद्र खंदारे, अंबादास धुळे, जुबेर कुरेशी, हामिद कुरेशी, पिंटु ठमके, ज्ञानेश्वर शिंदे, नीवृती पोटे, गजानन बोन्सले, देवानंद इंगोले, इश्वर गोस्वामी, दर्शन भंडारी, कविता पोपलवाड, छाया धुळध्वज आदि शहर व तालुका कांग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



