क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी.
उमरखेड .
आज महात्मा ज्योतिबा फुले विदयालय
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद देशमुख सर, तर प्रमुख अतिथी म्हणून महिला पत्रकार सविता चंद्रे , शिंदे बाबू, पर्यवेक्षक सुरते सर, सौ. देवसरकर, विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार सविता मॅडम चंद्रे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यासोबत चर्चा केली. विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. मुलींनी आधुनिक काळात कसे वागावे या संदर्भात त्यांनी आपली मत मांडले.
अनेक विद्यार्थ्यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर भाषण आणि गीत सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देशमुख सर यांनी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी करिअरची कास धरली पाहिजे असे मत व्यक्त केले. अभ्यासातून विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व घडवली पाहिजे आणि वाचनातून समृद्ध झाले पाहिजे. असे विचार प्रगट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ देवसरकर मॅडम यांनी केले तर, सौ जाधव मॅडम यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री आर. डी. शिंदे सर तर आभार प्रदर्शन सौ माने मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
277 thoughts on “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी.”