कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह; मात्र ई-केवायसी व फार्मर आयडीच्या तांत्रिक अडचणी दूर करा बेलखेड कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन ; पात्र लाभार्थींना दिलासा देण्याची मागणी उमरखेड –
कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह; मात्र ई-केवायसी व फार्मर आयडीच्या तांत्रिक अडचणी दूर करा
बेलखेड कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन ; पात्र लाभार्थींना दिलासा देण्याची मागणी
उमरखेड –
राज्य शासनाने राबविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असल्याची भावना व्यक्त होत असतानाच, योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी आता पुढे येत आहे
उमरखेड तालुक्यातील बेलखेड कार्यक्षेत्रातील विविध सहकारी सोसायट्यांमधील अनेक पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी, फार्मर आयडी, आधार प्रमाणीकरण तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडथळे येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी काही शिथिलता आनने महत्वाचे ठरते असेही निवेदनात म्हटले आहे की , शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला असून त्याबद्दल शेतकरी वर्ग शासनाचा ऋणी आहे. मात्र केवळ तांत्रिक त्रुटींमुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणे ही खेदाची बाब आहे. ई-केवायसी, फार्मर आयडी व आधार पडताळणीतील अडचणी दूर करून पर्यायी पडताळणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी संस्था व संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन अशा प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत, या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय पोहोचावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने या अडचणींकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आवश्यक निर्णय घेतल्यास राज्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे
——–


The login process is secure and very straightforward. I appreciate how they handle user privacy and account security. I always use akunboslogin.
The mobile app is a game changer. I can play my favorite jili games while commuting without any glitches. Get the jili979app if you want convenience on the go.
I’ve been looking for a stable platform and this one really delivers. The interface is smooth and the payouts are fast. Definitely check out winpkr2 if you want a reliable experience.
Yoour stytle iis soo unique copared too othe folks I’ve rea stuff from.
I appreciage yoou forr postying whuen you’ve goot thee opportunity, Guess I will jut bookkmark his webb site.
xnxx
If you are looking for high win rates, this is the place to be. I just hit a nice jackpot and the withdrawal was instant. slotgacor777 is legit.