मुक्त विद्यापीठ सर्वच बाबतीत आघाडीवर – प्रा. डॉ. दयाराम पवार पत्रकार सन्मान सोहळा व आत्मदर्पण प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन  उमरखेड :-

youtube

मुक्त विद्यापीठ सर्वच बाबतीत आघाडीवर – प्रा. डॉ. दयाराम पवार

पत्रकार सन्मान सोहळा व आत्मदर्पण प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

उमरखेड :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील डिजिटल तंत्रज्ञानामुळे आजच्या घडीला आमचे विद्यार्थी सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्र संचालक तथा शिक्षण शास्त्र विद्या शाखा चे सहयोगी प्रा. डॉ. दयाराम पवार यांनी केले ते गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळा व आत्मदर्पण विशेषांक प्रकाशन सोहळा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दिनांक 29 एप्रिल रोजी म्युझियम सभागृहात बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. या. मा. राऊत, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे अमरावती विभागीय संचालक प्रा. डॉ. सुभाष सोनूने , पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा जि. प. यवतमाळ चे माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर आणि प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. एम. बी. कदम उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी उमरखेड सारख्या ग्रामीण भागात पत्रकारितेचे शिक्षण विद्यार्थी घेत असल्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास केंद्राकडून काढण्यात येत असणारे विद्यार्थ्यांसाठीचे अभ्यास दौरे व प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेण्यासाठी अभ्यास केंद्र घेत असलेला पुढाकार पाहून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहणार नाहीत असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचलन, प्रस्तावना व आभार अभ्यास केंद्र संयोजक प्रा. बी. यु. लाभशेटवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र सहाय्यक विकास माने यांच्यासह जन संज्ञापन व वृत्तपत्र पदवी विभागाचे प्रा. संतोष मुडे , प्रा. सिद्धेश्वर जगताप , प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार, प्रा. व्यंकटेश पेन्शनवार यांचेसह प्रवेशित विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!