उमरखेड येथे बुधवारपासून अखंड शिवनाम सप्ताह सुरू

youtube

उमरखेड येथे बुधवारपासून अखंड शिवनाम सप्ताह सुरू.
शिवकथा, परमरहस्य ग्रंथ पारायण, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे अनावरण ,रक्तदान शिबिर इत्यादी अनेक कार्यक्रमाचे आयोजन
उमरखेड :-

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील शिवाजी वार्डातील महात्मा बसवेश्वर संस्थान मध्ये परमपूज्य डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने येत्या २३ फेब्रुवारी पासून २ मार्च २०२२ पर्यंत महाशिवरात्रि उत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .
या सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ या वेळात शिवपाठ व शिवनाम जप ,सकाळी ६ ते ७ अभिषेक व आरती, सकाळी ८ ते १० परमरहस्य ग्रंथ पारायण ,दुपारी २ ते ४ गाथा भजन, सायंकाळी ४ ते ६ शिवपाठ व शिवनाम जप ,दररोज रात्री ७ ते १० शि.भ.प. नागेश महाराज विभुते परभणी यांची शिवकथा, रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत शिवजागर अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .बुधवार दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पंचाक्षरी खडकेश्वर महाराज यांच्या हस्ते पंचकलश पूजन झाल्यानंतर सौ. रजनीताई वगरकर यांच्या मार्गदर्शनात ग्रंथराज परमरहस्य पारायणास सुरुवात होणार आहे. शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वा. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे अनावरण व मंदिराचे लोकार्पण गु.ष.ब्र. १०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी जिल्हा परभणी, तसेच गु.ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत जि. परभणी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शि. भ. प. शोभनाताई नागपूर यांचे प्रवचन होणार असून रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता गु.ष.ब्र. १०८ रुद्रमुनी शिवाचार्य महाराज मुदखेड यांचे आशिर्वचन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वा. नेत्रतपासणी शिबीर संपन्न होणार आहे. मंगळवार दि. १ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्रि उत्सव साजरा होणार असून सकाळी ८ वा. सौ. रजनीताई वगरकर यांचे मार्गदर्शनात सामूहिक इष्टलिंग पूजा ,दुपारी २ वा. सामूहिक शिवभजन कार्यक्रम, दुपारी ४ वा. टाळ आरती कीर्तन ,सायंकाळी महाआरती व रात्री १२ वा.महादेवाला रुद्राभिषेक संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक २ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वा. ग्रंथराज परमरहस्य पारायण ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात येणार असून दुपारी १२ वा.शि.भ. प. भूषण स्वामी वाखारीकर यांचे प्रसादा वरील कीर्तन होणार आहे. या वेळी गु.ष.ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी व वेदांताचार्य गु.ष.ब्र.१०८ दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गुरूवर्यांच्या आशीर्वचनाने व महाप्रसादाने अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
अखंड शिवनाम सप्ताह व महाशिवरात्री महोत्सवात गायक राजेश्वर थोटे ,मन्मथ थोटे ,उमाकांत शिराळे, हार्मोनियम वादक सुरेश पाटील, तालमणी राचय्या स्वामी लोहगावकर ,गायिका सौ.रत्नमाला विनोद हदगांवकर तसेच उमरखेड शहरातील सर्व भजनी मंडळे यांचे सहकार्य मिळणार असून जास्तीत जास्त भाविकांनी अखंड शिवनामाच्या व जागराचा या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समिती व महात्मा बसवेश्वर संस्थान तर्फे करण्यात येत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!