जुनी पेन्शन करिता राज्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा.

जुनी पेन्शन करिता राज्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा
उमरखेड
जुनी पेन्शन लागू करा या एकमेव मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी मोर्चा तहसील कार्यालवरून मार्ग क्रमन करीत निघाले तसेच 2005 पासून महाराष्ट्र शासनाने सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन बंद केले होते अनेक वेळा अनेक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला निवेदने आंदोलने केली परंतु जुनी पेन्शन योजना चालू झाली नाही सध्या महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन चालू आहे या काळात दरम्यान तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील या अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी एकवटले आहेत आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी आज रस्त्यावर उतरले आहेत करिता संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 19 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज उमरखेड शहरात तहसील कार्यालययातुन सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भव्यदिव्य रॅली काढून मोर्चा ला सुरुवात केली आहे या मोर्चा ला नगरपरिषद कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती , शिक्षण विभाग, तहसील कार्यालय व विदयालय अशा विविध कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला आहे.
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.