youtube

बस चालक नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार  आरोपी अटक

उमरखेड

दि.22/03/2025 रोजी अल्पवयीन मुलगी बस स्टँड उमरखेड येथे हजर असतांना बस चालक आरोपी संदिप विठ्ठलराव कदम वय-40 वर्ष रा. महात्मा फुले वार्ड उमरखेड हा अल्पवयीन मुलीस बोलला की तु कुठे जात आहे असे बोलून तु माझे सोबत नांदेड येथे चल म्हणाल्या वरुन बस मध्ये बसवुन नांदेड येथे गेले. आरोपीची ड्यूटी ही नांदेड ते नागपुर या बसवर असल्याने तो अल्पवयीन मुलीला सोबत घेवुन नागपुर येथे निघाला दि.23/03/2025 रोजी चे सकाळी अंदाजे 05.00 वा चे सुमारास नागपुर बसस्थानक येथे पोहचले नंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला त्याचे रुमवर घेवुन गेला व त्याचे रुमवर कोणीही नसल्याने त्याने जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर शरीरसंबंध केले. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेवून सोलापुर बस ने सोलापुर कडे जात आहे. वगैरे माहिती प्राप्त होताच मा.वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली टिम तयार करुन सदर आरोपी हा उमरखेड बस स्थानक येथे येताच त्यास तातडीने चौकशी कामी ताब्यात घेतले आहे. तसचे अल्पवयीन मुलीचे जबानी रिपोर्ट वरुन पो. स्टे. उमरखेड येथे अप क्र 177/2025 कलम 137(2), 64(1), 96 BNS, सह कलम 4,8,12 बा.लै.अ.अ.सह कलम 3(2),va, 3(2)v, 3(1)w(i) (ii) अ.जा.ज.कायदा प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बी जे हर्षवर्धन सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिंदे, सपोनि सारीका राऊत, पोउपनि धरणे, पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652, पोशि/137 यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बी जे हर्षवर्धन सा हे करीत आहे.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!